चांग ताछ्यान

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हे चिनी नाव असून, आडनाव चांग असे आहे.

चांग ताछ्यान (देवनागरी लेखनभेद: चांग दाछ्यान; सोपी चिनी लिपी: 张大千 ; पारंपरिक चिनी लिपी: 張大千 ; फीन्यिन: Zhāng Dàqiān ; वेड-जाइल्स: Chang Ta-Chien ;) (मे १०, इ.स. १८९९ - एप्रिल २, इ.स. १९८३) हा जागतिक स्तरावर लोकप्रियता कमवलेला चिनी चित्रकार होता. आरंभीच्या काळात पारंपरिक चिनी चित्रशैलीतील चित्रांसाठी ख्याती असलेला चांग इ.स. १९६० च्या दशकापासून दृक प्रत्ययवादी व अभिव्यक्तिवादी चित्रशैलींकडे वळला. पुरातन कलाकॄती म्हणून गणल्या गेलेली काही पारंपरिक चिनी चित्रे त्याची निर्मिती असल्यामुळे तो इ.स.च्या विसाव्या शतकातल्या तरबेज चित्रकारांपैकी एक मानला जातो .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →