अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेची १९७४मधे स्थापना झाली. ह्या संस्थेने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची अनोख्या पद्धतीने मुहूर्तमेढ रोवली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वैचारिक मंथन, व्याख्यान, परिसंवाद, चर्चा आदींचा समावेश असतो. पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. भवानीशंकर, पं. काशीनाथ बोडस, वीणा सहस्त्रबुद्धे, अरीण चांदीवाले, पं. यशवंतबुवा जोशी , कविवर्य वसंत बापट, न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सुनील गावस्कर, व्हाइस ॲड. मनोहर आवटी, एर मार्शल सदानंद कुलकर्णी, लेफ्ट. अशोक जोशी, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. शिवाजीराव भोसले, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार अशा अनेकांनी चतुरंगच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चतुरंग प्रतिष्ठान
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?