चक्र (चाक, वर्तुळ) हे सूक्ष्म शरीरातील एक मानसिक किंवा आध्यात्मिक ऊर्जा-केंद्र आहे. हिंदू आणि बौद्ध तांत्रिक योग आणि ध्यानधारणेमध्ये याचा उपयोग ध्यानासाठी पूरक साधन म्हणून केला जातो. ही चक्रे आपल्या शरिरातील निरनिराळी कार्ये नियंत्रित करतात असे मानले जाते.
८ व्या शतकातील मध्ययुगीन बौद्ध ग्रंथांमध्ये चार किंवा पाच चक्रांचा उल्लेख आढळतो, तर हिंदू स्रोतांमध्ये ही संख्या भिन्न आहे. यातील सात चक्रांचे स्वरूप सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. याचे वर्णन सर जॉन वूड्रॉफ यांच्या १९१९ मधील द सरपंट पॉवर (The Serpent Power) या पुस्तकात आढळते, जे पूर्णानंद यती यांच्या १५७७ मधील 'षट्-चक्र-निरूपण' (सहा चक्रांचे स्पष्टीकरण) या ग्रंथाचे ढोबळ भाषांतर आहे.
आधुनिक पाश्चात्य गूढवादामध्ये चक्रांकडे वास्तविक परंतु अतिंद्रिय ऊर्जा-केंद्रे म्हणून पाहिले जाते. हा दृष्टिकोन १८८० च्या दशकात हेलेना ब्लावत्स्की आणि इतर थिऑसॉफिस्ट (ब्रह्मविद्या) विचारवंतांमुळे उदयाला आला. पुढे 'वूड्रॉफ' यांचे पुस्तक आणि 'चार्ल्स डब्लू. लेडबेटर' यांच्या १९२७ मधील 'द चक्राज' या पुस्तकामुळे या संकल्पनेला आकार मिळाला. नंतरच्या काळात यामध्ये मनोवैज्ञानिक गुणधर्म, इंद्रधनुष्य आणि अल्केमी (कीमिया/रसतत्र), ज्योतिषशास्त्र, रत्ने, होमिओपॅथी, कब्बाला आणि टॅरो कार्ड यांसारख्या इतर प्रणालींशी संबंधित अनेक संदर्भ जोडले गेले.
चक्र (योग)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?