चंद्रिका कुमारतुंगा (सिंहला: චන්ද්රිකා බන්ඩාරනායක කුමාරතුංග ; रोमन लिपी: Chandrika Kumaratunga ;) (जून २९, इ.स. १९४५ - हयात) ही श्रीलंकेतील राजकारणी आहे. ती १२ नोव्हेंबर, इ.स. १९९४ ते १९ नोव्हेंबर, इ.स. २००५ या काळात श्रीलंकेची चौथी राष्ट्राध्यक्ष होती. त्याआधी १९ ऑगस्ट, इ.स. १९९४ ते १२ नोव्हेंबर, इ.स. १९९४ या अल्पकाळासाठी ती पंतप्रधानपदीही आरूढ होती. सॉलोमन वेस्ट रिजवे डीयास भंडारनायके व सिरिमावो भंडारनायके या श्रीलंकेच्या दोन माजी पंतप्रधानांची ती कन्या आहे. इ.स. २००५ सालापर्यंत ती श्रीलंका फ्रीडम पार्टी या राजकीय पक्षाची अध्यक्ष होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंद्रिका कुमारतुंगा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.