घोष कण्ठ्य ऊष्मन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

घोष कण्ठ्य ऊष्मन् हा एक प्रकारचा व्यंजनात्मक ध्वनी आहे जो विविध बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये वापरला जातो. हा ध्वनी मराठीत नसतो, परंतु हिंदीत 'ग़', आणि जास्ती दुर्मिळपणे, 'घ़' असे लिहितात. या अक्षराला फारशी आणि अरबी प्रदत्त शब्दांमध्ये वापरले जातो. आंतरराष्ट्रीय ध्वन्यात्मक वर्णमालेमध्ये या ध्वनीचे प्रतिनिधित्व करणारे चिन्ह [ɣ] आहे, हे ग्रीक अक्षर गामा ⟨ γ ⟩ चे लॅटिनीकृत रूप आहे, ज्याचा आधुनिक ग्रीकमध्ये असाच उच्चार होतो. याचा आलेखीयदृष्ट्या समान असलेल्या [ɤ] शी गोंधळ करू नये, जे, अर्ध-संवृत पश्‍चस्वर प्रसृतोष्ठ स्वरासाठीचे आयपीएचिन्ह, जे काही लेखनांमध्ये घोष कण्ठ्य ऊष्मनासाठी वापरले जाते.

चिन्ह [ɣ] चा वापर कधीकधी कण्ठ्य अन्तस्थाला दर्शवण्यास देखील केला जातो, जो मात्र, विवृती उच्चारभेददर्शकासह अधिक अचूकपणे लिहिला जातो: [ɣ̞] किंवा [ɣ˕] आयपीए मध्ये कण्ठ्य अन्तस्थासाठी [ɰ] हे एक समर्पित चिन्ह देखील आहे.

काही भाषांमध्ये एक घोष पश्चकण्ठ्य ऊष्मन् देखील असतो, ज्याला प्र-अलिजिह्वीय असेही म्हणतात. घोष प्रकण्ठ्य ऊष्मनासाठी, ज्याला पश्चतालव्य असेही म्हणतात, घोष तालव्य ऊष्मन् पहा.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →