ग्लोब थिएटर हे इंग्लंडच्या लंडन शहरातील नाट्यगृह होते. हे नाट्यगृह १५९९मध्ये विल्यम शेक्सपियरची नाटकमंडळी लॉर्ड चेंबरलेन्स मेन ने साउथवार्क भागात थेम्स नदीच्या दक्षिण तीरावर बांधले होते.
हे नाट्यगृह २९ जून, १६१३ रोजी आगीत नष्ट झाले. त्याच जागेवर दुसरे ग्लोब थिएटर जून, १६१४मध्ये बांधले गेले. हे नाट्यगृह १६४२ मध्ये लंडनमधील सगळी नाट्यगृहे बंद होई पर्यंत खुले होते.
येथे शेक्सपियरची नाटके तसेच बेन जॉन्सन, थॉमस डेकर आणि जॉन फ्लेचर यांची सुरुवातीची कामे येथेच सादर झाली.
१९९७मध्ये येथून २३० मी अंतरावर या नाट्यगृहाची आधुनिक पुनर्रचना शेक्सपियर्स ग्लोब नावाने झाली.
ग्लोब थियेटर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.