ग्लॉस्टर ( ) हे इंग्लंडमधील एक शहर आहे. देशाच्या ईशान्येतील ग्लॉस्टरशायर काउंटीचे हे प्रशासकीय केन्द्र आहे. ग्लॉस्टर सेव्हर्न नदीच्या काठावर वसले असून वेल्सच्या सीमेपासून २७ किमी अंतरावर आहे. ग्लॉस्टर महानगराची लोकसंख्या अंदाजे १,३२,००० आहे.
ग्लॉस्टर बंदर ग्लॉस्टर आणि शार्पनेस कालव्याद्वारे सेव्हर्नच्या खाडीला जोडलेले आहे.
ग्लॉस्टर शहराची स्थापना रोमन काळात झाली होती. इ.स. ९७ मध्ये सम्राट नर्व्हाच्या सत्ताकाळात हे कॉलोनिया ग्लेव्हम नर्वेन्सिस नावाने ओळखले जात असे.
दुसऱ्या हेन्रीने ११५५ मध्ये मध्ये या शहराला पहिली सनद दिली. १२१६मध्ये नऊ वर्षे वयाच्या तिसऱ्या हेन्रीचा राज्याभिषेक येथे झाला.
ग्लॉस्टरमध्ये मुख्यत्वे सेवा उद्योग आहेत तसेच आर्थिक, संशोधन, वितरण आणि हलकी औद्योगिक कंपन्या येथे आहेत. पूर्वी येथे विमान तयार करणाऱ्या कंपन्या होत्या.
ग्लॉस्टर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.