ग्लासगो

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ग्लासगो

ग्लासगो (इंग्लिश: Glasgow ; स्कॉट्स: Glesga; स्कॉटिश गेलिक: Glaschu) हे स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर आहे. डंडी शहर स्कॉटलंडच्या मध्य-पश्चिम भागात क्लाइड नदीच्या काठावर वसले असून ते एडिनबरापासून ७९ किमी तर लंडनपासून ५६६ किमी अंतरावर स्थित आहे. २०१० साली सुमारे ५.९३ लाख इतकी लोकसंख्या असलेले ग्लासगो युनायटेड किंग्डममधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

ब्रिटिश साम्राज्यकाळात ग्लासगो हे ब्रिटिश सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर होते. येथील जहाजबांधणी उद्योग तसेच बंदरामुळे ग्लासगो हे अमेरिका खंडामधील ब्रिटिश वसाहतींसोबत व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →