ग्रेनेडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. ग्रेनेडा ह्याच नावाचे मोठे बेट तसेच ग्रेनेडीन्स द्वीपसमूहातील दक्षिणेकडील सहा बेटे ग्रेनेडाच्या अधिपत्याखाली आहेत तर उत्तरेकडील बेटांवर सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स देशाची सत्ता आहे.
राष्ट्रकुल परिषदेचा सदस्य असणाऱ्या ग्रेनेडामध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही प्रकारचे सरकार आहे. युनायटेड किंग्डमची राणी एलिझाबेथ दुसरी हे ग्रेनेडाची राष्ट्रप्रमुख असून टिलमन थॉमस हा विद्यमान पंतप्रधान आहे.
ग्रेनेडा देश येथील मोठ्या प्रमाणावर लागवड होणाऱ्या जायफळासाठी ओळखला जातो. येथील एकूण लोकसंख्या केवळ १.१ लाख इतकी आहे.
ग्रेनेडा
थोडक्यात पण महत्त्वाचे.