गोळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.रा.स्व.संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांचे हे मूळ गाव आहे. राष्ट्रीय सेवा समिती रत्नागिरी या संस्थेतर्फे येथे प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती सेवा प्रकल्प चालविला जातो. धर्मसिंधुकार काशिनाथशास्त्री तथा बाबा पाध्ये यांचे हे मूळ गाव आहे. श्री देव गणपती मंदिर हे ग्रामीण यात्रा स्थळ या गावात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोळवली (संगमेश्वर)
या विषयातील रहस्ये उलगडा.