गोल्ड कोस्ट (क्वीन्सलंड)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गोल्ड कोस्ट (क्वीन्सलंड)

गोल्ड कोस्ट (इंग्लिश: Gold Coast) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या ९४ किमी दक्षिणेस वसले आहे. सुमारे ५.९ लाख लोकसंख्येचे गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इ.स. १८७५ साली वसवले गेलेले गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठ्या पर्यटन केंद्रांपैकी एक आहे. २०१८ राष्ट्रकुल खेळ स्पर्धा येथे भरवल्या जातील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →