गोंधळ हा संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित २०२५ चा मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात इशिता देशमुख, योगेश सोहोनी, किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा, निषाद भोईर, अनुज प्रभू, विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अहवालानुसार, सलग २५ मिनिटांचे एकच टेक (कंटीन्यूअस वन-टेक सीन) असणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.
गोंधळ या चित्रपटाला ५६ वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (IFFI) 'गोल्डन पीकॉक पुरस्कारा'साठी नामांकित करण्यात आले होते, तसेच संतोष डावकहर यांनी 'सिल्वर पीकॉक' श्रेणीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला. याशिवाय, ९९ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म' श्रेणीसाठी भारताकडून अधिकृत प्रविष्टी म्हणून देखील या चित्रपटाची निवड करण्यात आली.
गोंधळ (मराठी चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.