गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते.
संस्कृतमध्ये उंड म्हणजे जमीन, भूमी तसेच पृथ्वी असा होतो. उंड चा उंड्र असा उपयोग होतानाचा अर्थ रज किंवा धूळ असा होतो.
सेटलमेंट अधिकारी कॅप्टन वॉर्ड हे गोंड या जमातीच्या नावाचा अर्थ सांगताना, संस्कृत मधील ‘गो’+‘उंड’ या दोन शब्दांपासून गोंड हा शब्द बनला आहे, असे नमूद करतात. त्यांच्या मते गोंड म्हणजे पृथ्वी अथवा शरीर असून, शब्दाचा जमिनीवरील समाज (भूमिपुत्र) असा मथितार्थ आहे.
आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्त्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्त्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती, आजही ती आहे.
गोंड की कोईतूर? असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय.
‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस.
प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून कुयवा म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो.
‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. इरावती कर्वे यांनी त्यांच्या मराठी लोकांची संस्कृती या ग्रंथात म्हटले आहे.
गोंड
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.