गुलाबजाम

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गुलाबजाम

गुलाबजांब (मराठी लेखनभेद: गुलाबजाम) हा भारतीय उपखंडात प्रचलित असणारा, मिठाई वर्गातील खाद्यपदार्थ आहे. खव्यात काही प्रमाणात मैदा मिसळून केलेल्या गोळ्यांपासून गुलाबजाम बनवले जातात. हे गोळे तेलात तळून नंतर साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. काही वेळा या साखरेच्या पाकात वेलदोडा, गुलाबपाणी, केशर, केवडा यांचा स्वाद दिला जातो. साखरेच्या पाकातल्या गुलाबजामप्रमाणेच साखरेत घोळवलेले सुके गुलाबजामदेखील काही ठिकाणी बनवले जातात.

भारतीय उपखंडाखेरीज तुर्कस्तानात केमालपाशा तात्लिसी (अर्थ: केमाल पाशा मिठाई) नावाचा गुलाबजामसारखा खाद्यपदार्थ बनवला जातो. स्थानिक चिझाच्या गोळ्यांना साखरेच्या पाकात बुडवून तो खाद्यपदार्थ बनवतात. काही ठिकाणी रव्याचे गुलाबजाम ही बनवतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →