गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कंधार येथील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते.
पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता, देवकर (तृतीयपंथी), मनकवडे, बहुरूपी, नंदीबैलवाले, वराहपालक, मसणजोगी, नाथगोसावी, फकीर, वासुदेव, कोळी, वैदू, गोंदणवाल्या बाया, जाते उपटणाऱ्या माउल्या, बाळ संतोषी म्हणणाऱ्या माया, खेळवाले, दशावतारी अशा अनेक भटक्या-उपेक्षितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांची कला, व्यथा, समस्या जाणून घेण्यासाठी गुराखी संमेलनाला सुरुवात झाली.
‘नाहीरे’ वर्गातल्या उपेक्षित दलित-पददलित, अस्पृश्य म्हणून फेटाळलेल्या, विटाळलेल्या, बहिष्कृत, मायमाउल्यांच्या कष्टाच्या रक्त-घामातून हे गुराखी साहित्य जन्माला येते.
कुठलाही भपकेबाजपणा, जाहिरातबाजी न करता उत्स्फूर्तपणे हे साहित्य निसर्गाशी एकरूप होत जन्म घेते.
गुराखी साहित्य संमेलन
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.