गुरव

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गुरव

गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे.हा तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाने देवळात देवाची पूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. अजूनही अनेक गावांतील देवळांत पुजारी गुरव असतो.(खतावणी गुरव अपवाद आहेत जे की गावडे गुरव)



गुरव समाज हा शैव समाज आहे. भगवान शंकराची भक्ती करणारे म्हणजे शैव. आजही गावागावात गुरव समाज मंदिरामध्ये पूजा अर्चना करताना दिसतात. कारण त्यांच्याकडे हे काम पारंपरिक रित्या चालत आलेले आहे.



संत काशीबा गुरव हे गुरव समाजातील थोर संत होऊन गेले. संत सावता माळी यांचे ते समकालीन होते. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आहेत.

भगवान शंकरांच्या पूजेचा मान शैव लोकाना असायचा तेच आजचे गुरव.

आणि काळानुरूपे ते गुरवच राहीले. मंदिरातील पूजा अर्चना गुरव समाज करत असल्याने गावातून त्यांना धान्य किंवा काही वार्षिक मानधन अस दिल जात.

आणि गुरवांचा उल्लेख हा 12 बलुतेदार मध्ये आता येतो.

गुरवांचा इतिहास तसा खूप पुरातन काळापासून आहे फक्त त्यावर साहित्य निर्माण झालं नाही .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →