गुप्त (१९९७ चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

गुप्त: द हिडन ट्रुथ ज्याचे संक्षिप्त नाव गुप्त आहे, हा १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला राजीव राय दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील ॲक्शन थरार चित्रपट आहे. या चित्रपटात बॉबी देओल, मनीषा कोइराला आणि काजोलच्या मुख्य भूमिकेत आहेत. त्रिमूर्ती फिल्म्सच्या बॅनरखाली वितरीत करण्यात आलेल्या या चित्रपटात राज बब्बर, प्रेम चोप्रा, रझा मुराद, कुलभूषण खरबंदा, परेश रावल, दलीप ताहिल, शरत सक्सेना, सदाशिव अमरापूरकर, ओम पुरी ऋषी, प्रिया आणि अन्य कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपताचया गाण्यांची रचना विजू शाह यांनी केली होती. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम थरार चित्रपटांपैकी एक मानला जातो. त्याचे कथानक फ्रेंच लेखक लुई थॉमस यांच्या गुड चिल्ड्रन डोन्ट किल (१९६७) या गुन्हेगारी/रहस्यमय कादंबरीवर आधारित आहे.

४३ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, गुप्तला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (राय) यासह ८ नामांकने मिळाली आणि सर्वोत्कृष्ट खलनायकासह ३ पुरस्कार जिंकले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →