गीताई हे विनोबा भावे यांनी भगवद्गीताचे मराठीत केलेले ओवीबद्ध भाषांतर होय. गीतेतील श्लोकांच्या अर्थाचा आशय न बदलता त्यातील श्लोकांचे भाषांतर किंवा समश्लोकी रचना विनोबा यांनी केली आहे. हे लेखन विनोबा भावे यांनी १९३२ साली केले. याच्या २०१७ सालापर्यंत २६८ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. आपल्या आईला भगवत गीता समजावी म्हणून त्यांनी भगवद्गीतेचे भाषांतर मराठीत केले.
ताई माउली माझी, तिचा मी बाळ नेणता | पडता रडता घेई उचलुनी कडेवरी||
या शब्दात विनोबा यांनी गीताईचे महत्त्व वर्णन केले आहे.
गीताई
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.