गीत श्रीराम सेठी (जन्म १७ एप्रिल १९६१) हा बिलियर्ड्सचा एक व्यावसायिक खेळाडू आहे ज्याने १९९० च्या दशकात बऱ्याच काळातील खेळावर वर्चस्व गाजवीले. त्यांचा जन्म दिल्लीत झाला आणि अहमदाबादमध्ये ते मोठे झाले. १९९२-९३ मध्ये त्यांना भारतीय सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सम्मानीत केले. आशियाई खेळात त्यांनी भारतासाठी १ स्वर्ण पदक (१९९८ आशियाई खेळ), २ रौप्य पदक (१९९८ आशियाई खेळ, २००२ आशियाई खेळ) आणि २ कांस्य पदक (२००२ आशियाई खेळ, २००६ आशियाई खेळ) मिळविले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गीत सेठी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?