गिरिजाबाई केळकर (सप्टेंबर, इ.स. १८८६ - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८०) या मराठी लेखिका होत्या. यांचे पूर्वाश्रमीचे नाव दौपदी श्रीनिवास बर्वे असून त्यांचे वडील श्रीनिवास सखाराम बर्वे हे गुजरातमध्ये स्थायिक होते. गिरिजाबाईंचा जन्म त्यांच्या आजोळी मुंबई गिरगावातील आंग्ऱ्याच्या वाडीत झाला. त्यांचे आजोबा भूजच्या संस्थानिकांचे निवृत्त दिवाण विनायक नारायण भागवत हे होते. गुजराती पाचवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांना सहावीसाठी बर्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजच्या शाळेत घातले. त्या शाळेत असताना गिरिजाबाईंनी शेजारच्या आजीबाईंना वाचून दाखविण्याच्या निमित्ताने त्यांनी हरिविजय, रामविजय, पांडवप्रताप या पोथ्या वाचल्या. पुढे १५व्या वर्षी लग्न झाल्यानंतर गिरिजाबाई पुण्यात आल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गिरीजाबाई केळकर
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?