गिरिधारी यादव (जन्म १४ एप्रिल १९६१) हे भारतीय राजकारणी, लोकसभा सदस्य आणि जनता दल (युनायटेड) राजकीय पक्षाचे सदस्य आहेत. ते बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
यादव लोकसभेवर चार वेळा निवडून आले आहेत आणि बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत. ते जनता दल मध्ये असताना बिहार विधानसभेवर आणि ११व्या लोकसभेवर निवडून आले होते. राष्ट्रीय जनता दलमध्ये असताना ते बिहार विधानसभा आणि १४व्या लोकसभेवर निवडून आले होते. यादव २०१० मध्ये जनता दल (संयुक्त) मध्ये सामील झाले दोनदा बिहार विधानसभेवर आणि १७ व्या लोकसभेत व १८ व्या लोकसभेत निवडून आले आहेत.
गिरिधारी यादव
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.