गाझियाबाद हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक मोठे शहर आहे. गाझियाबाद शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात नवी दिल्लीपासून २५ किमी व नोएडापासून २० किमी अंतरावर वसले आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा भाग असलेल्या गाझियाबादची लोकसंख्या २०११ साली २३ लाख होती. गाझियाबाद पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रगत औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे.
गाझियाबादची स्थापना इ.स. १७४० मध्ये मुघल साम्राज्यादरम्यान केली गेली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर गाझियाबादची झपाट्याने प्रगती झाली व येथे अनेक कारखाने व उद्योग उभारले. अजच्या घडीला उत्तर प्रदेशामधील औद्योगिक शहरांमध्ये कानपूर खालोखाल गाझियाबादचा क्रमांक लागतो. दिल्लीच्या जवळ स्थित असल्यामुळे गाझियाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहिली आहेत व गाझियाबादला दिल्लीच्या उपनगराचा दर्जा प्राप्त झाला आहे.
गाझियाबाद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.