गागरोन किल्ला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

गागरोन किल्ला

गागरोन किल्ला हा भारतातील राजस्थान राज्याच्या झालावाड जिल्ह्यातील डोंगरी किल्ला आहे. डोंगरात असलेल्या निवडक जलदुर्गांंपैकी एक आहे. हा किल्ला १२व्या शतकात बिजलदेव सिंग दोड (राजपूत राजा) याने बांधला होता. पुढे शेरशाह सूरी आणि अकबर यांच्या ताब्यातही किल्ला आला. आहू नदी आणि काली सिंध नदीच्या संगमावर हा किल्ला बांधला आहे. किल्ल्याला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे आणि पुढच्या बाजूला एक खंदक आहे आणि त्यामुळे त्याला जलदुर्ग हे नाव पडले आहे. २०१३ मध्ये राजस्थानमधील ६ डोंगरी किल्ल्यांचा एक भाग म्हणून ह्या किल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →