गर्दिश हा १९९३ चा भारतीय हिंदी भाषेतील अॅक्शन क्राइम चित्रपट आहे जो प्रियदर्शन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला होता. चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफ, शम्मी कपूर, ऐश्वर्या भास्करन, डिंपल कपाडिया आणि अमरीश पुरी यांनी भूमिका केल्या आहे. हा १९८९ च्या मल्याळम चित्रपट किरीदम चा रिमेक आहे.
या चित्रपटाने दोन फिल्मफेर पुरस्कार जिंकले — सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन ( साबू सिरिल) आणि सर्वोत्कृष्ट अॅक्शन (थ्यागराजन). सोबत सर्वोत्कृष्ट अभिनेता (श्रॉफ), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (अमरीश पुरी) आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री (कपाडिया) साठी नामांकन देखील मिळाले. हा चित्रपट अभिनेता मुकेश ऋषी यांचे खलनायक म्हणून पदार्पण आणि ऐश्वर्या भास्करनचे बॉलिवूड पदार्पण आहे.
गर्दिश (१९९३ चित्रपट)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.