गरुड पुराण हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असून याला वैष्णव संप्रदायात अधिक महत्त्व आहे. या पुराणात भगवान विष्णु आणि त्यांचे वाहन पक्षीराज गरुड यांच्यातील संवाद दिलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने मानवी जीवन, मृत्यू, मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवास, कर्माचे फळ, स्वर्ग आणि नरक या संकल्पनांचे सविस्तर वर्णन केले आहे. हिंदू परंपरेनुसार कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर १३ दिवसांच्या शोककाळात या ग्रंथाचे वाचन करण्याची प्रथा आहे, जेणेकरून मृताच्या आत्म्याला शांती मिळावी आणि जिवंत माणसांना सत्कर्माची प्रेरणा मिळावी. केवळ मृत्यूनंतरच्या गोष्टीच नव्हे, तर गरुड पुराणात योग, खगोलशास्त्र, वैद्यकशास्त्र (आयुर्वेद), धर्मशास्त्र आणि नीतिशास्त्रावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
सर्वसाधारणपणे हा ग्रंथ मनुष्य मेल्यानंतर गीतेच्या १५ व्या अध्यायाचे पारायण करून झाल्यानंतर वाचतात.
गरुड पुराण
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.