गमन (अर्थ: स्थलांतर) हा १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे, ज्यात फारुख शेख आणि स्मिता पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत तसेच नाना पाटेकर सहाय्यक भूमिकेत आहेत. उमराव जान (१९८१) बनवणाऱ्या मुझफ्फर अलीचे हे दिग्दर्शकीय पदार्पण होते. हा चित्रपट शहरी स्थलांतराच्या निरर्थकतेच्या समस्येशी संबंधित आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातून मुंबईत आलेल्या एका स्थलांतरिताची कथा आहे, जो टॅक्सी ड्रायव्हर म्हणून आपल्या नवीन जीवन सुरू करण्याचा प्रयत्न करतो.
चित्रपटाचे संगीत जयदेव यांचे होते, ज्यांना त्यांच्या कामासाठी १९७९ मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता आणि "आप की याद आती रही" या गाण्यासाठी छाया गांगुली यांना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. शहरयारने चित्रपटासाठी गाणी लिहिली, विशेषतः "सीने में जलन, आँखों में तूफान", सुरेश वाडकर यांनी गायले, ज्याने स्थलांतरित समाजाच्या परकेपणा आणि तुटलेल्या स्वप्नांवर प्रकाश टाकला. गझल गायक हरिहरन यांनी या चित्रपटाद्वारे पार्श्वगायनात पदार्पण केले.
गमन (चित्रपट)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!