कोराडी औष्णिक विद्युत केंद्र

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कोराडी औष्णिक विद्युत केंद्र (केटीपीएस) महाराष्ट्रातील नागपूर जवळ कोराडी येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे .हे विदर्भातील (जे भारतातील एक ऊर्जा अधिक्य असलेला प्रदेश आहे) चार प्रमुख वीजनिर्मिती प्रकल्पांपैकी एक आहे. हे वीजनिर्मिती केंद्र १९७४ मध्ये कार्यान्वित झाले आणि महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)ची अनुषंगी कंपनी असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महानिर्मिती) द्वारे चालविलेल्या नऊ सक्रिय वीजनिर्मिती केंद्रांपैकी एक आहे. या प्रकल्पात ८ युनिट कार्यरत आहेत आणि एकूण १७०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता आहे. एक ४४० किलोवोल्टची प्रस्तावित कोराडी ते भुसावळ उच्चशक्ति पारेषण तारमार्ग नागपूरला मुंबईशी जोडेल. केटीपीएसच्या आवारात मध्यम व वरिष्ठ पातळीवरील अभियंते, तंत्रज्ञ आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी महानिर्मितीची प्रशिक्षण संस्था देखील आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →