गणेश वेंकटरामन हा एक भारतीय अभिनेता आहे जो प्रामुख्याने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो. उन्नाइपोल ओरुवन (२००९) आणि कंदहार (२०१०) मध्ये काम करण्यापूर्वी त्याने राधा मोहनच्या अभियुम नानुम (२००८) मध्ये काम केले होते.
गणेशने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात दूरचित्रवाणी मालिकांमधून केली होती. त्यात आंतरिक्ष आणि मायावी यांचा समावेश आहे, जी तमिळ दूरचित्रवाणीमधील मालिका होती. हैदराबादी उर्दूमध्ये चित्रित करण्यात आलेला एक प्रायोगिक चित्रपट, द आंग्रेझ (२००६) द्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर, त्यांनी राधा मोहन यांच्या कौटुंबिक नाटक, अभियुम नानूम (२००८) द्वारे तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. कमल हासन, मोहनलाल आणि व्यंकटेश यांच्यासमवेत उन्नाइपोल ओरुवन (२००९) या द्विभाषिक चित्रपटात काम करताना तो पोलीस अधिकारी म्हणून दिसला.
अभिनयापूर्वी, गणेश वेंकटरामन एक मॉडेल होते आणि ग्लॅडरॅग्स मिस्टर इंडिया २००३ मध्ये निवडले गेले होते आणि मिस्टर वर्ल्ड २००४ मध्ये भारताचा प्रतिनिधी होता.
गणेश वेंकटरामनचा जन्म तामिळ ब्राह्मण अय्यर असलेल्या पालकांच्या पोटी झाला. त्यांचे अभिनेत्री निशा कृष्णनसोबत नोव्हेंबर २०१५ मध्ये लग्न झाले. जून २०१९ मध्ये त्यांना पहिले अपत्य समायरा झाली. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी या जोडप्याला त्यांचे दुसरे अपत्य, अमर नावाचा मुलगा झाला.
गणेश व्यंकटरमण
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.