गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी म्हणजेच गझनी येथील महमूदाने भारतावर इ.स. १००८-०९ मध्ये केलेली स्वारी होती. या स्वारीचा त्याचा उद्देश हिंदुशाही राज्याच्या विरोधात होता. सिंधुनदीकाठी दोन्ही सैन्यांमध्ये तुंबळ युद्ध झाले होते. युद्ध चालू असताना हिंदुशाही राजा आनंदपालचा जखमी झालेला हत्ती आनंदपालसह रणांगणावरून पळाला. त्यामुळे हिंदू सैनिक भयभीत झाले व राजाचे पलायन म्हणजे युद्ध संपल्याचे लक्षण मानत असल्याने त्याचे सैन्यही सैरावरा पळू लागले आणि महमूदच्या सैन्याचा विजय झाला. विजयी तुर्की सैन्याने वैहिंद आणि आणि त्याप्रदेशातील अन्य महत्त्वाची नगरे ताब्यात घेतली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गझनीच्या महमूदची भारतावरील सहावी स्वारी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.