गंगा (देवी)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

गंगा (देवी)

गंगा ही गंगा नदीचे अवतार/मानवीकरण आहे, जिची हिंदू लोक शुद्धीकरण आणि क्षमेची देवी म्हणून पूजा करतात. अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या गंगेला बहुतेकदा एक गोरी, सुंदर स्त्री म्हणून चित्रित केले जाते, जी मकर नावाच्या दैवी मगरीसारख्या प्राण्यावर स्वार आहे.

गंगेचे काही प्राचीन उल्लेख ऋग्वेदात आढळतात, जिथे तिचा उल्लेख सर्वात पवित्र नद्यांमध्ये केला आहे. तिच्या कथा प्रामुख्याने रामायण, महाभारत आणि पुराण यांसारख्या वैदिकोत्तर ग्रंथांमध्ये आढळतात.

रामायणात तिला हिमालयाचे रूप असलेल्या हिमावतची ज्येष्ठ कन्या आणि माता पार्वतीची बहीण असे वर्णन केले आहे. तथापि, इतर ग्रंथांमध्ये तिचा उगम विष्णूपासून झाल्याचे नमूद केले आहे. आख्यायिका तिच्या पृथ्वीवर अवतरणावर केंद्रित आहेत, जे राजेशाही ऋषी भगीरथामुळे झाले होते, ज्याला देव शिव यांनी मदत केली होती.

महाभारतात, गंगा ही ही कुरु राजा शंतनूची पत्नी आहे व योद्धा भीष्मची आई आहे.

हिंदू धर्मात, गंगा ही मानवतेची आई मानली जाते. यात्रेकरू गंगा नदीत त्यांच्या नातेवाईकांच्या अस्थींचे विसर्जन करतात, जी त्यांच्या मते आत्म्यांना मोक्षाच्या जवळ आणते, व जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता देते. गंगा दशहरा आणि गंगा जयंतीसारखे सण गंगेच्या काठावर असलेल्या अनेक पवित्र ठिकाणी साजरे केले जातात, ज्यात गंगोत्री, हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी आणि कोलकातामधील काली घाट यांचा समावेश आहे. , थायलंडमधील लॉय क्रथोंग उत्सवादरम्यान गौतम बुद्धांसोबत गंगेची पूजा केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →