खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले. त्यांचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ला झाला. त्यांच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्यांची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्यांचे पालनपोषण केले.
बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले होते. त्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीराम यांनाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरुद्ध आंदोलने करणाऱ्यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणाऱ्या न्यायाधीश किंग्ज फोर्डला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.
खुदीराम बोस
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?