खानवडी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

खानवडी हे पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव सासवड पासून पूर्वेला ७ कि.मी. सासवड – सुपा रस्त्यावर असून, गावाची लोकसंख्या सुमारे एक हजार आहे . गावचे क्षेत्रफळ साधारण ९ चौ. कि. मी. असून, गावाच्या पुर्वेला बेलसर व पारगाव ही गावे आहेत. दक्षिणेला वाळूंज व खळद, तसेच पश्चिमेला एखतपुर, मुंजवडी तर उत्तरेला सिंगापुर हे गाव आहे. खानवडी गावाला 'खानवडी ' हे नाव फार पूर्वीपासूनच आहे. पूर्वीच्या काळी चुनखडीच्या खाणी या गावामध्ये होत्या व अजूनही आहेत म्हणून खानवडी हे नाव पडले असेल अशी ग्रामस्थांची समजूत आहे. गावामध्ये बाळसिद्धनाथ हे गावाचे मुख्य व आराध्य दैवत असून त्याची यात्रा चैत्र वद्य चतुर्थीस भरवली जाते. त्याचप्रमाणे गावाच्या पश्चिम बाजूस पांडवकालीन व पाच पांडवांनी बांधलेली जुन्या पद्धतीचे व घडीव दगडात बांधकाम केलेले मल्लिकार्जुनाचे शिवालय आहे .

खानवडी गावामध्ये पूर्वीपासून 'होले व फुले ' आडनावाची माळी समाजाचे लोक राहतात. गावामध्ये चार उपवाड्या आहेत

१)बोरावके मळा(शिंदे मळा)

२)मधला मळा(पाटिल वस्ती)

३)खालचा मळा(होले वस्ती)

४)फुले वस्ती.



सध्या गावामध्ये 'महात्मा फुले स्मारक समितीने' 'महात्मा फुले' यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक भवनाची उभारणी केली असून अनेक सामाजिक कामांमध्ये स्मारक समिती भाग घेऊन महात्मा फुले यांचे कार्य चालू ठेवण्याचा प्रयत्न करित आहे.शिखर शिंगणापूर येथे चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेत मानाची कावड असणाऱ्या "तेल्या भुत्याचा" कावडीमध्ये सर्व समाज आणि पंचक्रोशी तील गावकऱ्यांचा सहभाग मनोभावे आणि श्रद्धापूर्वक असतो.



अनधिकृत घरे जागा म्हणजे जणू पर्वणीच

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →