खरेदी खत

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा शासकीय पुरावा म्हणजेच खरेदी खत होय. जमिनीचा व्यवहार करताना जी किंमत ग्राहक आणि जमीन विकणारा यांच्या सहमतीने ठरलेली रक्कम अदा करून व्यवहार पूर्ण झाल्यावर खरेदी खत केले जाऊ शकते. जमीनीचे मालकी हक्क हस्तांतरीत करण्यासाठी खरेदी खत केले जाते.

खरेदी खतला जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा म्हणून संबोधले जाते. या दस्तऐवजात जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या दोन व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रासाठी आणि किती रुपयांना झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते. खरेदी खत झाल्यानंतर सदर माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →