खंडो कृष्ण गर्दे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

खंडो कृष्ण गर्दे (जन्म : गुर्लहासूर-बेळगाव जिल्हा, २ डिसेंबर १८४८; - पुणे, १३ ऑगस्ट १९२६) ऊर्फ बाबा गर्दे हे एक कानडी आणि मराठी भाषांत लेखन करणारे सव्यसाची लेखक-कवी होते.

त्यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झाले होते, पण वडील शांकरवेदान्ती असल्याने बाबांना लहानपणापासूनच वेदान्ताची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात त्यांनी काही काळ प्राथमिक शाळांत शाळा-तपासणीचे काम केले.

सिद्धारूढ स्वामी यांच्या सांगण्यावरीन गर्दे यांनी संस्कृत पंचदशीचे आरंभी कानडीत पद्यमय आणि नंतर मराठीत गद्य-पद्यात्मक भाषांतर केले. वेदान्ताची ओळख सर्वसामान्यांना व्हावी म्हणून त्यांनी ग्रंथरचना केली. त्यासाठी तत्त्वज्ञान सोपे करून सांगणारी वेगवेगळ्य़ा चालीतील आणि वेगवेगळ्या रागांत त्यांनी पद्यरचना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →