क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. हे शहर मलेशियाचे सांस्कृतिक व आर्थिक केंद्र आहे, तसेच येथे मलेशिया संसदेचे घर सुद्धा आहे. शिवाय राजा यांग दी पर्तुआन अगोंग देखील, येथीलच त्याच्या इस्ताना नेगारा नावाच्या महालात स्थायिक आहे.
१९९० पासून क्वालालंपूर येथे अनेक राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळी स्पर्धा पार पडल्या.
१९९८ कॉमनवेल्थ गेम्स सुद्धा येथे पार पडले, सध्या येथे अनेक बदल झालेले आहेत. येथे जगातील सगळ्यात उंच जुळे मनोरे आहेत, त्याला पेट्रोनास टॉवर्स असे म्हणतात. हे मलेशियाच्या आगामी प्रगतीचे प्रतीक बनले आहे. क्वालालंपूर येथे व्यापक अशी रस्तेप्रणाली आहे जी येथील विस्तृत जनतेसाठी पूरक आहे.
उदा. मास रॅपिड ट्रान्झिट (एम.आर.टी), लाईट मेट्रो (एल.आर.टी), बस रॅपिड ट्रान्झिट (बी.आर.टी), मोनोरेल, कम्युटर रेल आणि एअरपोर्ट रेल लिंक.
क्वालालंपूर ही जगात पर्यटनदृष्ट्या आणि व्यापारीदृष्ट्या खूप पुढारलेली आहे. लोकांद्वारे सर्वात जास्त पसंत पडणाऱ्या शहरांच्या यादीत हे शहर ३८ व्या क्रमांकावर आहे. जगातील सगळ्यात मोठ्या १० मॉल मधील ३ मॉल इथे आहेत. जगातील पहिल्या ६० सुरक्षित शहरांमध्ये क्वालालंपूर हे ३१व्या क्रमांकावर आहे.
युनेस्कोने या शहराला पुस्तकांची राजधानी २०२० हे नाव देखील दिले आहे.
क्वालालंपूर
थोडक्यात पण महत्त्वाचे.