क्लेर एलिझाबेथ फॉय (१६ एप्रिल, १९८४ - ) एक ब्रिटिश अभिनेत्री आहे. नेटफ्लिक्स नाटक मालिका द क्राउन (२०१६–२०२३) मधील तरुण राणी एलिझाबेथ दुसरीच्या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे, ज्यासाठी तिने गोल्डन ग्लोब आणि दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार जिंकले आहे.
फॉयने सुपरनॅचरल कॉमेडी मालिका बीइंग ह्यूमन (२००८) च्या पायलट एपिसोडमधून स्क्रीनवर पदार्पण केले. रॉयल नॅशनल थिएटरमध्ये तिच्या व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर, तिने बीबीसी वन मिनीसिरीज लिटिल डोरिट (२००८) मध्ये मुख्य भूमिका केली आणि अमेरिकन ऐतिहासिक कल्पनारम्य नाटक सीझन ऑफ द विच (२०११) मध्ये तिने चित्रपटात पदार्पण केले. द प्रॉमिस (२०११) आणि क्रॉसबोन्स (२०१४) या दूरचित्रवाणी मालिकेतील प्रमुख भूमिकांनंतर, फॉयने बीबीसी मिनीसीरीज वुल्फ हॉल (२०१५) मध्ये दुर्दैवी राणी ॲन बुलिनची भूमिका साकारल्याबद्दल प्रशंसा मिळवली व ब्रिटिश अकादमी दूरचित्रवाणीचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी नामांकन प्राप्त केले.
२०१८ मध्ये, तिने स्टीव्हन सॉडरबर्गच्या मानसशास्त्रीय थ्रिलर अनसेनमध्ये भूमिका केली आणि डेमियन चाझेलच्या बायोपिक फर्स्ट मॅनमध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्राँगची पत्नी जेनेट शेरॉनची भूमिका केली. जेनेट शेरॉनच्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. त्यानंतर तिने ॲमेझॉन प्राइम मालिकेत अ व्हेरी ब्रिटिश स्कॅन्डल (२०२१) मध्ये मार्गारेट कॅम्पबेल, डचेस ऑफ आर्गीलची भूमिका साकारली आहे. वूमन टॉकिंग (२०२२) आणि ऑल ऑफ अस स्ट्रेंजर्स (२०२३) या ड्रामा चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे- व या शेवटच्या कामासाठी तिला आणखी एक बाफ्टा नामांकन मिळाले आहे.
क्लेर फॉय
थोडक्यात पण महत्त्वाचे.