क्रिस्तो रेदेंतोर (पोर्तुगीज: Cristo Redentor) हा ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरोमधील येशू ख्रिस्ताचा एक पुतळा आहे. ३९.६ मी उंच व ३० मी रूंद असलेला हा पुतळा येशू ख्रिस्ताचा जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा पुतळा आहे. हा पुतळा रियोजवळील कोर्कोव्हादो नावाच्या ७०० मी उंचीच्या डोंगराच्या माथ्यावर स्थित असून तो इ.स. १९२२ ते १९३१ ह्या काळादरम्यान बांधला गेला. क्रिस्तो रेदेंतोर रियो व ब्राझिलच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक असून ब्राझिलमधील ख्रिस्ती धर्माचे प्रतिक मानला जातो.
२००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी क्रिस्तो रेदेंतोर हे एक आहे.
क्रिस्तो रेदेंतोर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.