क्रिस्टोफर हेम्सवर्थ (११ ऑगस्ट १९८३) हा एक ऑस्ट्रेलियन अभिनेता आहे. हॉलीवूडमध्ये चित्रपट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दूरदर्शन मालिका होम अँड अवे (२००४-२००७) मध्ये किम हाइडची भूमिका साकारून तो प्रसिद्ध झाला. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) मध्ये त्याने थॉर (२०११) चित्रपटात शीर्षक भूमिका साकारली. अलीकडेच थॉर: लव्ह अँड थंडर (२०२२) चित्रपटात भूमिकेची पुनरावृत्ती केली, ज्याने त्याला जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये स्थापित केले.
त्याच्या इतर चित्रपटांत स्टार ट्रेक (२००९), स्नो व्हाइट अँड द हंट्समन (२०१२) आणि त्याचा उत्तरभाग द हंट्समन: विंटर्स वॉर (२०१६), रेड डॉन (२०१२), ब्लॅकहॅट (२०१५), मेन इन ब्लॅक: इंटरनॅशनल (२०१९), एक्सट्रॅक्शन (२०२०) हेअॅक्शन चित्रपट, थरारपट अ परफेक्ट गेटवे (२००९) आणि विनोदी चित्रपट घोस्टबस्टर्स (२०१६) यांचा समावेश आहे. समीक्षकांनी सर्वात जास्त प्रशंसित केलेल्या ख्रिसच्या चित्रपटांमध्ये विनोदी भयपट द केबिन इन द वुड्स (२०१२) आणि चरित्रात्मक क्रीडापट रश (२०१३) यांचा समावेश आहे, ज्यामध्ये त्याने जेम्स हंटची भूमिका केली होती.
क्रिस हेम्सवर्थ
यामागील विज्ञान आणि इतिहास.