१९९६ च्या क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया संघांत खेळला गेला.
श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मार्क टेलर (७४ - ८३ चेंडू) व रिकी पॉंटिंग (४५ - ७३ चेंडू) यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०१ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. हे दोन्ही गडी बाद झाल्यानंतर ऑस्टेलियाची घसरगुंडी झाली व संघ १/१३७ वरून ५/१७० ह्या स्थितित आला. श्रीलंकेच्या फिरकी माऱ्या समोर ऑस्ट्रेलियन फलंदाज हतबल झाल्यासारखे वाटत होते.
श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणारे सनथ जयसुर्या ९(७) व रोमेश कालुवितरणा ६(१३) धावा काढून लवकरच तंबूत परतले, तेव्हा संघाची धावसंख्या होती २३/२. असंका गुरुसिन्हा ६५ (९९) व अरविंद डि सिल्व्हा १०७(१२४) यांच्या ११५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर श्रीलंकी संघाने अंतिम सामना २२ चेंडू व ७ गडी राखून आरामात जिंकला.
अरविंद डि सिल्व्हाला त्याच्या गोलंदाजीत (३/४२) व फलंदाजीत १०७(१२४) अशा उत्तम कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले.
क्रिकेट विश्वचषक, १९९६ - अंतिम सामना
थोडक्यात पण महत्त्वाचे.