क्राकूफ ( Kraków ; इंग्लिश लेखनभेदः क्राकोव्ह) हे पोलंड देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. क्राकूफ हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. १६व्या व १७व्या शतकांदरम्यान क्राकूफ ही पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाची सह-राजधानी (व्हिल्नियससह) होती.
हे शहर पोलंडच्या दक्षिण भागात व्हिस्चुला नदीच्या काठावर वसले आहे. येथील ऐतिहासिक इमारतींसाठी क्राकूफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
क्राकूफ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?