कोमायागुआ

या विषयावर तज्ञ बना.

कोमायागुआ

कोमायागुआ हे होन्डुरासमधील शहर आहे. कोमायागुआ प्रांताची राजधानी असलेले हे शहर देशाची राजधानी तेगुसिगाल्पा पासून ८० किमी वायव्येस आहे. २०१५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,५२,०५१ होती. येथील मध्यवर्ती भागात असलेल्या चर्चचे घड्याळ अमेरिकेमधील सगळ्यात जुने सार्वजनिक घड्याळ आहे.

या शहराची स्थापना ८ डिसेंबर, इ.स. १५३७ रोजी सांता मरिया दिला नुएव्हा व्हायादोलिद नावाने झाली. कोमायागुआ जवळ सोतो कानो वायुसेना तळ आहे. येथे अमेरिकेची एक सैनिकी तुकडी तैनात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →