कोपरगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्याचे मुख्यालय कोपरगाव शहर हे आहे. हे शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. ते अहिल्यानगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहिल्यानगर पासून ११५ कि.मी.वर येते. कोपरगावपासून मुंबईचे अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. कोपरगावी राष्ट्रसंत श्री मौनगिरी जनार्दन स्वामी महाराज यांचे समाधी मंदिर आहे.
कोपरगावात फार वर्षांपासून मकरसंक्रांतीला पतंग उडवले जातात. आदल्या रात्रीपासून लहान मुलांपासून मोठी माणसे तयारीला लागतात. आदल्या रात्री मांजा तयार केला जातो.
कोपरगावापासून १ ते २ कि.मी. अंतरावर दैत्यांचे गुरू शुक्राचार्य यांचे मंदिर आहे. ती जागा दैत्यगुरू शुक्राचार्य यांची तपोभूमी होती. त्यांना त्यांची तपश्चर्या सुरू असताना गोदावरीच्या पश्चिम - पूर्व प्रवाहाची अडचण येऊ लागली, म्हणून त्यांची तपश्चर्या भंग होऊ लागली म्हणून त्यांनी त्यांच्या हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह दूर लोटला. तेथे वसाहत तयार झाली. त्या वसाहतीस ‘कोपरगाव’ असे नाव पडले
कोपरगावपासून शिर्डी (पूर्वीचे कोपरगांव तालुक्यातील) हे गाव साईबाबांच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधी आहे. शिर्डीला साईनगर नावाचे रेल्वे स्थानक झाले आहे, तेथे येण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकावर उतरले तरी चालते. आता २०१७ मध्ये नुकतेच शिर्डी येथे येण्यास कोपरगांव तालुक्यातील मौजे काकड़ी या गावात आंतरराष्ट्रीय विमानतळदेखील येथे सुरू झाले आहे. कोपरगाव ते शिर्डी हे अंतर रस्त्याने फक्त १५ कि.मी.आहे. कोपरगांव पासून साधारण ५ कि.मी अंतरावर ॐ गुरुदेव जंगलीदास महाराज यांचे शैक्षणिक गुरुकुल आहे.
कोपरगाव तालुका
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.