कोकणतील सामुदायिक जमीन व्यवस्था हा महाराष्ट्रतील कोकण प्रदेशातील पारंपरिक जमीनधारणा, महसूलप्रशासन|महसुली व्यवस्था आणि हक्कअभिलेख यांच्या इतिहासाशी संबंधित अभ्यासाचा विषय आहे. कोकणातील अनेक गावांमध्ये भातशेती, डोंगर उतारावरील शेती, वरकस जमीन, आडीची शेती, गुरचराईची क्षेत्रे तसेच इतर काही प्रकारच्या जमिनींचा वापर स्थानिक प्रथा, ग्रामव्यवस्था आणि परंपरागत वहिवाटीच्या आधारे होत असल्याचे The Gazetteer of the Bombay Presidency, महाराष्ट्रराज्य गॅझेटिअर, महसुली अभिलेख आणि इतर ऐतिहासिक स्रोतांमधून दिसून येते.
ब्रिटिशकालात करण्यात आलेल्या महसूल सर्वेक्षण, Bombay Land Revenue Code, 1879, Record of Rights प्रणाली आणि त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत तयार झालेल्या अभिलेखांमुळे या प्रदेशातील जमीनधारणा व महसुली नोंदींचे दस्तऐवजीकरण अधिक नियमित स्वरूपात करण्यात आले.
कोकणातील सामुदायिक जमीन व्यवस्था
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!