कॉलिन मॅकेन्झी

या विषयातील रहस्ये उलगडा.

कॉलिन मॅकेन्झी

कॉलिन मॅकेन्झी (१७५४/५८ - १८२१) हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत लश्कर अधिकारी होते जे नंतर भारताचे प्रथम सर्व्हेयर जनरल बनले. ते पुरातन वास्तुंचे संग्रहक आणि एक ओरिएंटलिस्ट होते. त्यांनी स्थानिक दुभाषे व विद्वानांचा मदतीने दक्षिण भारतातील धर्म, मौखिक इतिहास, शिलालेख अभ्यासले. सुरुवातीला वैयक्तिक आवड आणि त्यानंतर १७९५ मध्ये टिपू सुल्तानवर ब्रिटिशांनी विजय मिळविल्यानंतर अधिकृत सर्वेक्षक म्हणून त्यांनी मैसुर क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे काम त्यांनी केले आणि पुरातन नकाशाचे क्षेत्रफळावर पुरातन वास्तूंच्या जागा दाखविल्या. भारतीय हस्तलिखिते, शिलालेख, अनुवाद, नाणी व पेंटिंग यांचा अनमोल संग्रह त्यांनी केला. त्यांच्या निधना नंतर त्यांच्या पत्नीने हा संग्रह ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला विकला. हा संग्रह भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा स्रोत व भारताशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचा सर्वात मौल्यवान संग्रह आहे.

कॉलिन मॅकेन्झींचा जन्म स्कॉटलंड मधील स्टॉर्नॉय द लुईस बेटावर झाला. ते वडील मर्डोक मॅकेन्झी हे व्यापारी होते. अंदाजे तीस वर्षांचे असताना २ सप्टेंबर १७८३ रोजी ते मद्रासला आले व इन्फंट्री डिव्हिजनमध्ये कॅडेट म्हणून सामील झाले परंतु १७८६ मध्ये त्यांची कॅडेट ऑफ इंजिनियर म्हणून बदली करण्यात आली.

भारतात आगमन झाल्यानंतर त्यांची लॉर्ड फ्रान्सिस नेपियरची मुलगी हेस्टर हिचाशी भेट झाली. हेस्टरचा सॅम्युअल जॉन्सन यांच्याशी विवाह झाला होता जो मदुराई येथे प्रशासनिक सेवक म्हणून काम करीत होता. हेस्टरने कॉलिन मॅकेन्झीचा परिचय काही स्थानिक ब्राह्मणांशी करून दिला. या ब्राह्मणांच्या मदतीने कॉलिन मॅकेन्झीने प्राचिन भारतीय गणितीय घातगणन कोष्टकांचे ज्ञान व सोळाव्या शतकातील गणितज्ञ जॉन नेपियर निर्मित 'लोगॅरिथम' कोष्टके याचा इतिहास लिहिण्याचा प्रकल्प हाती घेतला. पुढे काही कारणाने हा प्रकल्प थांबला परंतु मॅकेन्झीचा प्राचीन भारतीय संस्क्रुतीत व ज्ञानात रस वाढला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →