केव्हिन रुड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

केव्हिन रुड

केव्हिन मायकेल रुड ( सप्टेंबर २१, १९५७) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा विद्यमान पंतप्रधान व मजूर पक्षाचा विद्यमान पक्षनेता आहे. ह्यापूर्वी रुड २००७ ते २०१० दरम्यान पंतप्रधानपदावर होता. ज्युलिया जिलार्डने २४ जून २०१० रोजी ऑस्ट्रेलियाच्या मजूर पक्षाचे नेतृत्वपद स्वीकारले आणि पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ३ वर्षे पंतप्रधानपदावर राहिल्यानंतर २६ जून २०१३ रोजी घेण्यात आलेल्या मजूर पक्षाच्या आंतरिक निवडणुकीमध्ये केव्हिन रुडने जिलार्डचा ५७ विरुद्ध ४५ अशा मतफरकाने पराभव केला व मजूर पक्षाचे नेतृत्व पटकावले. ही निवडणुक हरल्यास राजकारणामधून निवृत्त होऊ अशी घोषणा करणाऱ्या जिलार्डने पराजयानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व केव्हिन रूडने ह्या पदाची सुत्रे स्वीकारली. परंतु सप्टेंबर २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत रूडच्या मजूर पक्षाला बहुमत मिळवण्यात आले व लिबरल पार्टीला सर्वाधिक मते मिळाली.

समलिंगी विवाहाला पाठिंबा देणारा रुड हा पहिलाच ऑस्ट्रेलियन पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →