केरसुणी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

केरसुणी

केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी होते. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबाद जवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →