१२२१७/१२२१८ केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तिरुवनंतपुरमच्या कोचुवेली रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान धावते. तिरुवनंतपुरमला दिल्लीसोबत जोडणाऱ्या केरळ एक्सप्रेसला पर्याय म्हणून ही गाडी चालू करण्यात आली. केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस कोकण रेल्वेमार्गे धावते. संपर्क क्रांती शृंखलेमधील सर्वाधिक अंतर धावणारी ही गाडी तिरुवनंतपुरम व दिल्लीदरम्यानचे ३,०९१ किमी अंतर सुमारे ५४ तासांमध्ये पूर्ण करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.