केट मुलग्रु

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

केट मुलग्रु

कॅथरीन किरनॅन मुलग्रु (२९ एप्रिल, १९५५ (1955-04-29):डुब्युक, आयोवा, अमेरिका - ) एक अमेरीकी अभिनेत्री आहे, जी "रायन्स होप" मालिकेतील "मेरी रायन" व "स्टार ट्रेक:व्हॉयेजर" मालिकेतील "कॅथरीन जेनवे" या भूमिकेसाठी सुप्रसिद्ध आहे.

केटने इतर बऱ्याच दूरचित्र मालिका, नाटके व चित्रपटांमध्ये भूमिका केली आहे. तिला या विविध भूमिकांसाठी ओबी पुरस्कार, गोल्डन सॅटलाईट पुरस्कार, सॅटर्न पुरस्कार व अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहेत.

केट ही अल्झायमर रोगाला लढा देण्यासाठी असलेल्या अल्झायमर असोसिएशन ह्या अमेरिकी स्वयंसेवी संस्थेची, नॅशनल ऍडव्हायझोरी कमीटीची कार्यक्षम सदस्या आहे आणि क्लिवलॅंड मेट्रो हेल्थ सिस्टम ह्या अमेरिकातील, ओहायो राज्यात असलेल्या क्लिवलॅंड शहरातील स्वयंसेवी संस्थेची सुद्धा कार्यक्षम सदस्या आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →