केअरटेकर हे स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील या २ तासांच्या एका भागाला, १-१ तासांचे दोन भाग म्हणून विभाजित करण्यात आले आहे. पहिला भाग, १६ जानेवारी १९९५ रोजी दूरचित्रवाणीवर प्रक्षेपित करण्यात आला. केअरटेकर, भाग १ हा स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील पहिल्या पर्वाचा, पहिला, व संपूर्ण मालिकेतलाही पहिला भाग आहे. दुसरा भाग, केअरटेकर, भाग २, हाही १६ जानेवारी १९९५ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. स्टार ट्रेक:व्हॉयेजरच्या संपूर्ण मालिकेत केट मुलग्रुने, कप्तान कॅथरीन जेनवेची भूमिका केली आहे. सुरुवातीला ह्या भागात कप्तान कॅथरीन जेनवेच्या भूमिकेसाठी जिनोव्हिव्ह बुझोल्डची निवड झाली होती, पण तिने मालिकेसाठी काम करणे मधेच सोडून दिले.
केअरटेकरया भागात असे दाखवले आहे की, नवीन तयार झालेल्या यू.एस.एस. व्हॉयेजर अंतराळजहाजाला, बॅड-लॅन्ड्स नावाच्या एका अंतराळातील एका जागेत, माक्वी नावाच्या अतिरेकी संस्थेच्या एका अंतराळ जहाजाचा शोध घ्यायची कामगिरी दिली जाते. शोध घेत असतांना, केअरटेकर नावाच्या प्रजातीचा प्राणी त्यांना पृथ्वीपासून ७०,००० प्रकाश वर्षे दूरअसलेल्या डेल्टा क्वाड्रंटमध्ये ओढतो.
केअरटेकर, भाग १ (स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिका)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.