स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन ही जीन रॉडेनबेरी यांच्या स्टार ट्रेक कथानकावर आधारीत स्टार ट्रेक या दूरचित्र शृंखलेतील मालिका आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका १९६० मध्ये त्यांनी बनवली व प्रक्षेपित केली. स्टार ट्रेक शृंखेलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारीत आहेत. विज्ञान कथा हे साहित्यातील एक प्रकार आहे.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन कथानक २४व्या शतकात वर्तविलेले आहे, ज्या मध्ये स्टारफ्लीट या पृथ्वीवरील संस्थेच्या, यु.एस.एस. एंटरप्राइझ नावाच्या अंतराळ जहाजाच्या, विविध कामगिऱ्या व मोहिमांच्या वेळेत घडलेल्या गोष्टीं बद्द्लचे वर्णन आहे. हे कथानक स्टार ट्रेकच्या शृंखेलेतील पहिली दूरचित्र मालिका, स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझच्या ७१ वर्षानंतर वर्तविलेले आहे. ह्या मालीकेचे सुरुवात व प्रथम प्रसारण सप्टेंबर २८, १९८७ रोजी, एनकाउंटर ऍट फारपॉइंट ह्या २-तासांच्या भागापासून झाली. त्या दिवशी हा भाग २.७ कोटी लोकांना प्रसारीत झाला होता. ह्या मालिकेत १७८ भाग होते जे ७ पर्वांमध्ये प्रसारीत झाले व यामुळे ही मालिका स्टार ट्रेक शृंखलेतील मालिकांमध्ये सर्वात मोठी मालिका ठरली. ह्या मालिकेचे शेवटचे प्रसारण मे २३, १९९४ रोजी ऑल गुड थिंग्स ह्या भागाने झाले.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेचे विविध वाहिन्यांवर, विविध वेळेत प्रसारण झाले, व ही मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. स्टार ट्रेक शृंखलेतील सर्व मालीकांमधील ही पहिली मालिका होती जिच्या लोकप्रियते मुळे स्टार ट्रेकच्या सर्व मालिकांच्या भागांचे पुनर्प्रसारण २००५ पर्यंत चालले. स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेला १८ एमी पुरस्कार मिळाले, व प्रसारणाच्या सातव्या पर्वात ही मालिका, अशी पहीली मालिका झाली जी एमी फॉर बेस्ट ड्रामॅटीक सीरीझ या पुरस्कारासाठी नामांकित झाली. ही मालिका ३ ह्युगो पुरस्कारासाठी सुद्धा नामांकित झाली व त्यापैकी २ ह्युगो ह्या मालिकेने पटकावले. पहिल्या पर्वातील द बिग गुडबाय ह्या भागाला एकसेलंस इन टेलीवीझन प्रोग्रामींग हा पीबॉडी पुरस्कार सुद्धा मिळाला. ह्या मालिकेच्या लोकप्रियते मुळे होऊन स्टार ट्रेक शृंखेलेतील चार चित्रपट बनवण्यात आले. स्टार ट्रेक:जनरेशन्स, स्टार ट्रेक:फर्स्ट काँटॅक्ट, स्टार ट्रेक:इनसरेक्शन व स्टार ट्रेक:नेमेसीस हे ते चित्रपट.
स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?